अभिनेता स्वप्निल जोशी याच्या विशेष उपस्थितीत रंगला “मुंबई लोकल” चित्रपटाचा ट्रेलर लाँच
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या प्रवासात झालेल्या नजरानजरेपासून आयुष्य बदलणाऱ्या घटनेपर्यंतचा रंजक प्रवास “मुंबई लोकल” या चित्रपटातून उलगडणार आहे. नुकताच या…
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या प्रवासात झालेल्या नजरानजरेपासून आयुष्य बदलणाऱ्या घटनेपर्यंतचा रंजक प्रवास “मुंबई लोकल” या चित्रपटातून उलगडणार आहे. नुकताच या…
मराठी रंगभूमीचा प्रेक्षक हा केवळ मनोरंजनासाठी नाटक बघत नाही, तर त्याला वेगळं, काहीतरी आशयघन अनुभवायचं असतं असा ठाम विश्वास व्यक्त…
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तब्बल ३४५ वर्षांनंतर पुन्हा एकदा परतणार आहेत, तेही एका नव्या आणि समकालीन रूपात! ज्या…
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘मना’चे श्लोक’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून मृण्मयी देशपांडे सहा नायकांसोबत दिसणार असल्याची…
अमेझॉन एमजीएम स्टुडिओजने आज जाहीर केले की त्यांचा बहुप्रतिक्षित थियेट्रिकल चित्रपट ‘निशांची’ यंदा १९ सप्टेंबर २०२५ रोजी संपूर्ण भारतात चित्रपटगृहांमध्ये…
भारतातील प्रीमियर हिंदी चित्रपटांचे चॅनल सोनी मॅक्स आपल्या प्रेक्षकांना रोमांचित करण्यासाठी ‘द डिप्लोमॅट’ हा चित्रपट घेऊन येत आहे. हा चित्रपट 29 जून रोजी दुपारी 1 वाजता सोनी मॅक्स वाहिनीवरून प्रसारित करण्यात येणार आहे. परदेशात अडकलेल्या एका नागरिकाला सोडवण्याबाबतच्या सत्य कथेवर आधारित या चित्रपटात पाकिस्तानातील भारतीय राजदूत जे. पी. सिंह च्या प्रमुख भूमिकेत जॉन अब्राहम आहे. उझ्मा अहमदच्या प्रकरणात जे. पी. सिंहची महत्त्वाची भूमिका होती. उझ्मा अहमद एक भारतीय महिला असून आपल्याला बळजबरीने एका विवाहबंधनात अडकवण्यात आल्याचा तिचा दावा होता. ती संरक्षणासाठी भारतीय दूतावासाचा आश्रय घेते. खैबर पख्तूनख्वाच्या सुंदर परंतु संघर्षाखाली असलेल्या खोऱ्यापासून या चित्रपटाची सुरुवात होते. तेथे आणून ठेवलेल्या असंख्य अपहृत महिलांपैकी एक आहे भारताची उझ्मा. येथे या महिलांचा अनन्वित छळ केला जातो. उझ्माला एका बनावट विवाहात ओढले जाते आणि विवाहानंतर तिला कैद करून तिचा छळ केला जातो. तेथून निसटण्याचा प्रयत्न ती करत राहते. या प्रकरणात सिंह यांनी गुंतागुंतीच्या आंतरराष्ट्रीय कूटनीतीमधून मार्ग काढून उझ्माला सुरक्षितपणे भारतात कसे पोहोचवले याची कहाणी आहे. तसे करताना त्यांना नैतिक दुविधा आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांना त्यांच्यावर येणाऱ्या संशयाला तोंड द्यावे लागले. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवम नायर यांनी केले आहे. सोनी मॅक्सवर या चित्रपटाचा प्रीमियर होण्याअगोदर अभिनेता जॉन अब्राहमने जे. पी. सिंह यांची भूमिका साकारण्याचा आपला अनुभव शेअर करताना म्हटले, “एका राजदूताची भूमिका करण्याचा अनुभव अद्भुत होता. एका राजदूताच्या प्रत्यक्ष जीवनाशी माझा परिचय आधीच झालेला आहे, कारण मी मद्रास कॅफे, बाटला हाऊस आणि परमाणु या चित्रपटांमध्ये अशा प्रकारची भूमिका केली आहे. डिप्लोमॅट चित्रपटाची भूमिका मला पुन्हा त्या क्षेत्रात घेऊन गेली. आणि यावेळीही माझा अनुभव खूप आनंददायक होता.” तो पुढे म्हणतो, “राजकीय घडामोडींच्या बाबतीत मी जागरूक आहे. त्यामुळे जगात काय चालले आहे याची मला समज आहे. मला वाटते, ज्या लोकांना राजकीय पातळीवर आणि आपल्या आसपास काय चालले आहे याची जाणीव नाही, त्यांना हा चित्रपट शिक्षित करेल.” हा चित्रपट बंद दरवाजांच्या मागे काय चालते, जे बातम्यांमध्ये कधीच दिसत नाही, त्यावर प्रकाश टाकते. हे कूटनीतीचे मौन विश्व आहे. या चित्रपटात दाखवले आहे की बऱ्याच वेळा मोठमोठी कूटनीतीची युद्धं शस्त्रास्त्रांनी नाही, तर शब्दांनी, रणनीतीने आणि न बोलता लढावी लागतात. या चित्रपटात जे. पी. सिंह यांना उझ्मा अहमदला भारतात सुरक्षितरित्या पोहोचवण्यासाठी कूटनीतीची आव्हाने, जिओपॉलिटिकल तणाव आणि कायद्याचा लढा कसा द्यावा लागला याचे चित्रण आहे. प्रत्यक्ष तंटा न करता रणनीती आणि माणसाचा दृढनिर्धार कसे काम करून जातात हे यात बघायला मिळते. एका आगळ्यावेगळ्या चित्रपट अनुभवासाठी सज्ज व्हा. एक असा अनुभव ‘जो सबको दीवाना बना दे’. बघा, ‘द डिप्लोमॅट’ संडे मेगा प्रीमियरमध्ये 29 जून रोजी दुपारी 1 वाजता फक्त सोनी मॅक्सवर.
परदेशात मराठी चित्रपटसृष्टीचा टक्का वाढवण्यासाठी अभिमानास्पद कार्य करत, गेल्यावर्षी प्रथमच ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ने ‘नाफा मराठी चित्रपट महोत्सव’ आयोजित करून…
प्रेम ही भावना प्रत्येकासाठी खास असते. प्रेमात पडल्यावर प्रत्येक क्षण जादूने भारलेला वाटतो. अशाच जादुई प्रेमाच्या प्रवासाला स्पर्श करणारं ‘गाडी…
मराठी चित्रपटांना हॉलिवूडच्या झगमगाटात सन्मानाने सादर करणाऱ्या ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ (नाफा) तर्फे आयोजित दुसऱ्या भव्य मराठी चित्रपट महोत्सवाला सॅनहोजे,…
सोनी BBC अर्थ प्रेक्षकांना अभ्यासपूर्ण आणि साहसी जुलैचा आनंद घेण्यासाठी आवाहन करत आहे. या महिन्यात ‘इन्साइड द फॅक्टरी’ च्या सीझन 9 मध्ये दैनंदिन उत्पादनांच्या मागील अद्भुत प्रक्रिया कशा असतात हे प्रेक्षकांना बघायला मिळेल. ‘द मिसअॅडव्हेंचर्स ऑफ रोमेश रंगनाथन’ सह प्रेक्षक धमाल आणि डोळे उघडणाऱ्या जागतिक प्रवासाचा आनंद घेतील. ‘वॉन्डर विथ द बेस्ट’ या संकलनासह ही वाहिनी काही चित्तथरारक मोहिमांचा प्रवास सादर करणार आहे. ‘इन्साइड द फॅक्टरी’ चा सीझन 9 14 जुलै 2025 पासून सुरू होत आहे. यामध्ये युरोपच्या काही प्रचंड मोठ्या फॅक्टरीज आतून बघता येतील. तेथील इनोव्हेशन, कौशल्य आणि लोकप्रिय पदार्थ किंवा वस्तूंच्या मोठ्या प्रमाणातील उत्पादनासाठी लागणारी मशीनरी पाहता येईल. पॅडी मॅकगिनेस या नवीन सादरकर्त्यासोबत ही मालिका फॅक्टरी फ्लोरच्या पलीकडे जाते आणि इतिहासकार रूथ गुडमनसोबत उत्पादनांचे जबरदस्त मूळ आणि त्यांच्या मागील यशोगाथा शोधते. चेरी हीली चीज कर्ल्स, चॉकलेट सीशेल्स, फ्लॅपजॅक्स आणि हार्डबॅक पुस्तकांच्या मागच्या शास्त्राचा शोध घेताना दिसेल. गोष्टी कशा बनवल्या जातात यांचे छुपे विश्व आतून बघण्यासाठी हा नवीन सीझन प्रेक्षकांना आमंत्रित करत आहे. यानंतर, 28 जुलै 2025 रोजी ‘द मिसअॅडव्हेंचर्स ऑफ रोमेश रंगनाथन’चा प्रारंभ होत आहे. या मालिकेत कॉमेडीयन रोमेश रंगनाथन प्रेक्षकांना जगातील काही अनपेक्षित पर्यटन स्थानांवर घेऊन जाण्याचे धाडस करताना दिसेल. ही ठिकाणे आहेत, हैती, इथियोपिया, अल्बेनिया आणि आर्क्टिक. स्थानिक लोकांचे मार्गदर्शन घेत रोमेश तेथील उप-संस्कृती, विशिष्ट खाद्य पदार्थ यांचा शोध घेईल आणि जितकी म्हटली जातात तितकी ही स्थाने खरोखर आव्हानात्मक आहेत का, तेथील सौंदर्य आणि मोहकता चकित करणारी आहे का याचे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करेल. कार्यक्रम हलक्याफुलक्या आणि विनोदी शैलीत सादर करण्यात आला आहे. हा कार्यक्रम प्रेक्षकांना अपारंपरिक प्रवासानुभवावर विचार करण्यास प्रेरित करतो. रोमेशच्या धाडसी कारनाम्यांसोबत सोनी BBC अर्थ 14 जुलै 2025 पासून ‘वॉन्डर विथ द बेस्ट’ हे सुंदर पर्यटनाचे एपिसोड असलेले खास संकलन देखील सादर करणार आहे. या विशिष्ट संकलनात प्रेक्षकांना विख्यात सादरकर्त्यांसोबत जगातील काही वैविध्यपूर्ण प्रदेश आणि संस्कृती यांचा शोध घेण्यास आमंत्रित करण्यात येत आहे. यामध्ये ज्या मोहिमांचा समावेश आहे, त्यामध्ये अॅलेक्झांडर आर्मस्ट्रॉंग सोबत केलेला आईसलँडचा प्रवास, जोआना लम्लीसोबत प्राचीन सिल्क रोडचा प्रवास, सू पर्किन्ससोबत गजबजलेल्या जपानचा प्रवास, दक्षिण कोरियाबाबत माहिती आणि सायमन रीव्हसोबत गंगा आणि श्रीलंकेचा अद्भुत प्रवास सामील आहे. या विशेष कार्यक्रमांमधून अप्रतिम दृश्य अनुभव मिळेल आणि कुशल शोधकांच्या दृष्टिकोनातून आपल्या ग्रहावरील सौंदर्य आणि विविधता साजरी होईल. त्यामुळे या जुलैमध्ये सोनी BBC अर्थ आवर्जून बघा. ‘वॉन्डर विथ द बेस्ट’ आणि ‘इन्साइड द फॅक्टरी’ हे कार्यक्रम 14 जुलैपासून अनुक्रमे रात्री 10:00 आणि रात्री 11:00 वाजता सादर होणार आहेत, तर ‘द मिसअॅडव्हेंचर्स ऑफ रोमेश रंगनाथन’ 28 जुलैपासून रात्री 10:00 वाजता सादर होणार आहे.
